Home वर्धा श्री संत जगनाडे महाराज जयंती उत्सवनिमित्त पालखी व दिंडी सोहळ्याचे आयोजन 

श्री संत जगनाडे महाराज जयंती उत्सवनिमित्त पालखी व दिंडी सोहळ्याचे आयोजन 

152

सेलू :–

येथील वडगाव रोड स्थित श्री संत संताजी जगनाडे महाराज मंदिरात संत जगनाडे महाराज जयंती उत्सव तथा श्री विठ्ठल रुक्मिणी प्राणप्रतिष्ठा दिवसानिमित् सोमवारी ता ८ ला दिंडी व पालखी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे यानिमित्त येथे विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून दरवर्षी हा उत्सव मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो

संताजी चॅरिटेबल ट्रस्ट द्वारा संचालित संत जगनाडे महाराज देवस्थान मध्ये श्री संत जगनाडे महाराज जयंती निमित्त सकाळी 9 वाजता मंदिरातून पालखी सोहळ्याला सुरवात होईल यात विविध गावातील भजनी मंडळीचा सहभाग राहणार आहे गावातील प्रमुख मार्गाने मार्ग क्रमण करीत दिंडया पताकासह पालखी मंदिरात पोहचताच याची सांगता केली जाते यानंतर हभप गुरूवर्य शांताराम महाराज जामुनकर झुणका यांचे गोपालकाल्याचे किर्तन होईल त्यानंतर दिंडी सोहळ्यात सहभागी होणार्‍या भजनी दिंड्याचा प्रमुख अतिथीचे हस्ते सन्मान करण्यात येणार आहे सायकांळी पाच वाजता पासून आलेल्या भाविकांना भोजन देऊन या उत्सवाची सांगता होईल यावेळी खासदार अमर काळे, शेखर शेंडे, शैलेश अग्रवाल, माजी जि प सदस्य राणा रणनवरे, सेलूच्या नगराध्यक्ष स्नेहल देवतारे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे

या कार्यक्रमाचा लाभ भाविकांनी घ्यावा असे आवाहन आवाहन संतांजी चॅरिटेबल ट्रस्ट चे अध्यक्ष मनोहर सोमनाथे, व पदाधिकारी अनिल देवतारे, डॉ केशव लोणकर, मनोहर वाघमारे, संजय धोगंडे, धनराज समर्थ, मिलींद सोमनाथे, महादेव वांदिले, राजेंद्र दंढारे, भास्कर दंढारे, विठोबाजी लाडेकर, उकेश चंदनखेडे, विजय खोडे, विनोद शिंदे, अशोक कलोडे, शामरावजी शेंडे, नरेश वांदीले, रविद्र आदमने भगवान तितरे आदीनी केले आहे.