Home वर्धा केजाजी कॉन्व्हेन्ट येथे बालक दिन उत्साहात साजरा

केजाजी कॉन्व्हेन्ट येथे बालक दिन उत्साहात साजरा

173

सेलू :–

स्थानिक श्री. संत केजाजी कॉन्व्हेन्ट घोराड येथे मुलांसाठी अनेक शैक्षणिक आणि प्रेरक कार्यक्रम आयोजित करीत बालक दीन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या वाढदिवसा निमित्त संपूर्ण भारतात बालक दीन साजरा करण्यात येतो. शाळेत सर्व प्रथम भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या फोटो चे विधिवत पूजन करून बालक दीन का साजरा केला जातो या विषयी माहिती विद्यार्थ्यांना देण्यात आली. यावेळी शाळेचे संस्था संचालक तथा मुख्याध्यापक प्रशांत झाडे, शाळेतील शिक्षिका सुवर्णा पिसे, करिश्मा तेलरांधे, आरती भुरे उपस्थित होते.