Home वर्धा सेलू उपबाजारपेठ येथे कापूस खरेदीचा शुभारंभ गुरुवारला

सेलू उपबाजारपेठ येथे कापूस खरेदीचा शुभारंभ गुरुवारला

119

सेलू :–

सेलु उपबाजारपेठ कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात उघड पद्धतीने या हंगामातील कापूस खरेदीचा श्रीगणेशा बुधवार दि. 12 नोव्हेंबर रोजी सकाळी 10.30 वाजता होणार आहे. यावेळि मुख्याधिकारी तथा सचिव महेंद्र भांडारकर, व संचालक मंडळाच्या उपस्थितीत संपन्न होणार आहे.

याप्रसंगी परिसरातील शेतकरी बांधवांनी व वाहनचालकांना आपला नविन कापूस विक्रीकरिता आणावा. तसेच परिसरातील सर्व शेतकरी बांधवांनी व वाहन चालकांनी आणि संबंधितांनी याप्रसंगी उपस्थित राहावे. व शेतकरी बांधवांनी आपला कापूस विक्री करीता उपबाजापेठ सेलु समितीच्या आवारात आणावा असे आवाहन सभापती केसरीचंद खंगारे ,उपसभापती प्रमोद आदमने, सचिव महेंद्र भांडारकर, संचालक विद्याधर वानखेडे, काशीनाथ लोणकर, गुणवंत कडु,अनिल जिकार,धनराज गिरी,शाम वानखेडे, संजय काकडे,सौ. राणी देशमुख , सौ. छबु पाटिल, सौ. रेणुका कोटंबकर,संदिप वाणी,मनोज तामगाडगे,शेख मुख्तार सत्तार ,वरुण दप्तरी,सतीष धोपटे,गोपाल कोपरकर, यांनी केले श्री अंबागडेजी, कापूस विभाग प्रमुख श्री ढोक व सर्व कर्मचारी व बाजार घटकांची उपस्थिती राहणार आहे.