Home वर्धा यशवंत विद्यालय हिंगणीच्या विद्यार्थीनीची राज्यस्तरीय कराटे स्पर्धेसाठी निवड

यशवंत विद्यालय हिंगणीच्या विद्यार्थीनीची राज्यस्तरीय कराटे स्पर्धेसाठी निवड

391

सेलू :–

शालेय नागपूर विभाग कराटे क्रीडा स्पर्धा २०२५ अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, गडचिरोली येथे आयोजित विभागीय स्तरावरील स्पर्धेत यशवंत विद्यालय, हिंगणी येथील विद्यार्थीनी कु. वैष्णवी योगेश इखार हिने उत्कृष्ट कामगिरी करत राज्यस्तरीय कराटे स्पर्धेसाठी निवड मिळवली आहे.

कु. वैष्णवीच्या या यशाबद्दल यशवंत ग्रामीण संस्थाचे अध्यक्ष समीरभाऊ देशमुख, सर्व संचालक मंडळ, शाळेचे मुख्याध्यापक  नंदकिशोर ठाकरे तसेच प्रशिक्षक  जी. एम. चौधरी व बोनी देवढे यांनी तिचे अभिनंदन केले.

शाळेतील सर्व शिक्षक, शिक्षिका आणि शिक्षकेत्तर कर्मचारी यांनीही तिच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

कु. वैष्णवीला प्रशिक्षण व मार्गदर्शन सलीम शेख यांनी दिले.