Home वर्धा पहिल्याच दिवशी पाचशे क्विंटल मालाची आवक

पहिल्याच दिवशी पाचशे क्विंटल मालाची आवक

117
Oplus_0

सात हजार दोनशे एकवीस रुपये प्रति क्विंटल दराने कापसाची खरेदी

सेलू :–

साई व्हाइट गोल्ड जिनिग रेहकी रोड येथे दिनांक सहा नोव्हेंबर ला कापूस खरेदी शुभारंभ करण्यात आला. पहिल्याच दिवशी कापसाची मोठ्या प्रमाणात आवक होती, जवळपास पाचशे क्विंटल माल खरेदी करण्यात आला. यावेळी पहिल्या शेतकऱ्याचा मान शुभम धानकुटे यांना मिळाला . विधिवत पूजा करून पहिल्या दिवशी नगदी चुकारा सात हजार दोनशे एकवीस रुपये देण्यात आला. यावेळी सिंधी कृषी उत्पन्न बाजार समिती उप बाजार पेठ सेलू चे ढोक, साई व्हाइट गोल्ड जिनिगचे संचालक कपिल चांडक. राजेश जोशी, अमोल टावरी, राजीव मुन, असलम पठाण यांची उपस्थित होती.