Home Breaking News केळझरचे गणपती मंदिरातील गणेशकुंडात आढळला तरुणीचा मृतदेह 

केळझरचे गणपती मंदिरातील गणेशकुंडात आढळला तरुणीचा मृतदेह 

1063

सेलू :–

तालुक्यातील केळझर येथील सिध्दिविनायक गणपती मंदिर परिसरातील गणेश कुंडातील विहिरीत दि. ७ नोव्हेंबर रोजी दुपारी १२ .४० ला तरूणीचा मृतदेह आढळुन आला. सदर युवतीची ओळख पटली असुन ती युवती सिंदी मेघे वर्धा येथील रहिवासी असुन साक्षी खुशाल देहारे वय २० वर्ष असे मृत तरूणीचे नाव आहे.

मृतक हि वर्धेची असुन ती एका क्याफेमध्ये काम करत असल्याचे नातेवाईकांनी सांगीतले. काल दिनांक ६ नोव्हेंबरला ती घरी एकटीच होती. दुपारी ती वर्धेवरुन केळझरला आली. गावात मृतक साक्षीचे नातेवाईक आहे. ती नातेवाईकाकडे न जाता सिध्दिविनायक गणपती मंदिर परिसरातील गणेश कुंड विहिरीकडे पोहचली. ३.३० वाजता तिने गणेश कुंड विहिरीचा फोटो तीचा मित्र भरतला पाठवला. भरतने याची माहिती तीच्या कुटुंबातील लोकांना दिली. कुटुंबातील लोकांनी सर्वीकडे शोधाशोध केली. परंतु साक्षीचा कुठे हि पत्ता न लागल्याने वर्धा पोलीसात ती बेपत्ता असल्याची तक्रार दाखल करण्यात आली होती आज दिनांक ७ नोव्हेंबरला गावातील नातेवाईक पोलीस पाटिल प्रकाश खंडाळे यांनी मंदिरातील गणेश कुंड विहिरीत डोकावुन पाहिले असता मृतक साक्षीची बँग पाण्यावर तरंगतानी दिसून आली. यावरुन साक्षीने या गणेश कुंडात आत्महत्या केली असावी. अस निष्कर्ष काढण्यात आला. याची माहिती केळझरचे पोलीस पाटिल प्रकाश खंडाळे यांनी सेलुचे ठाणेदार मनोज गभने यांना दिली. काही वेळातच सेलु पोलीस स्टेशनचे गणेश राऊत, देवा वणवे, लोकेश पवनकर यांनी घटनास्थळी येव पाहणी केली. या विहरीचा वापर आणी उपसा नसल्याने गाळ असल्याने म्रुतदेह आतमधी फसला असल्याचे लक्षात आले. गावातील नागरिकांच्या मदतीने गळ टाकुन दोन तीसानंतर म्रुतदेह बाहेर काढण्यात आला. घटनास्थळी ठाणेदार मनोज गभने, मंगेश राऊत, सचिन उपाध्ये यांनी भेट दिली. गणपती मंदिरचे सचिव सुभाष तेलरांधे घटनास्थळी उपस्थित होते.

मृतदेह बाहेर काढल्याची माहिती गावात पसरताच गावकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतल्याने. नागरिकांची मोठी गर्दी जमली होती. मृत्युचे कारण घटना लिहेपर्यत कळले नाही. तीने का आत्महत्या केली. मृतदेह बाहेर काढुन सेलू पोलिसांनी घटनेचा पंचनामा करून उत्तरिय तपासणीसाठी सेलूच्या ग्रामीण रुग्णालयात प्रज्वल लटारे यांच्या रुग्णवाहिकेने पाठविले. याप्रकरणी सेलुचे ठाणेदार मनोज गभने यांच्या मार्गदर्शनात सेलू पोलीस करीत आहे.