
वर्धा :-
शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांकडे शासनाचे दुर्लक्ष होत असल्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार अमर काळे यांच्या नेतृत्वाखाली २१ ऑक्टोबर रोजी सकाळी १० ते १२ वाजेपर्यंत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर महात्मा गांधी पुतळ्यासमोर महाविकास आघाडीचे धरना आंदोलन होणार आहे.
भाजप सरकारने निवडणुकीत शेतकऱ्यांची कर्जमाफी आणि मदतीची आश्वासने दिली होती. मात्र, अद्याप ती अमलात आलेली नाहीत. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. शासनाने जाहीर केलेली मदत तुटपुंजी असून ती शेतकऱ्यांच्या हाती पोहोचलेली नाही.
दिवाळीत शेतकऱ्यांच्या घरात अंधार घालण्याचा घाट सरकारकडून घातला जात असल्याचा आरोप महाविकास आघाडीने केला आहे. या पार्श्वभूमीवर हे आंदोलन करण्यात येणार असून शेतकऱ्यांसह सर्व कर्मचारी, ओल्या दुष्काळाच्या पिकांमुळे नुकसानग्रस्त शेतकरी यात सहभागी होणार आहेत.
नुकसानीची तातडीने भरपाई, सोयाबीन व कपाशी पिकांसाठी विशेष मदत, थकलेली वीजबिल माफी, कृषीपंप वीज पुरवठ्यात सवलत आणि कर्जमाफी यांसह शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी हे धरना आंदोलन होणार आहे.





