Home Breaking News अवैध दारू वाहतुकीवर हिंगणघाट पोलिसांची धडक कारवाई

अवैध दारू वाहतुकीवर हिंगणघाट पोलिसांची धडक कारवाई

155

7,40,000 लाखांचा मुद्देमाल जप्त – दोन आरोपींच्या विरोधात गुन्हा दाखल

हिंगणघाट ( वर्धा ):

पोलीस स्टेशन हिंगणघाटच्या पथकाने दिनांक 08 ऑक्टोबर 2025 रोजी पहाटे नांदगाव चौक परिसरात अवैध दारू वाहतूक करणाऱ्या दोघांवर छापा टाकून मोठी कारवाई केली.

मुखबीरच्या खबरेवरून पोलिसांनी रेड केली असता, आरोपी मंथन किशोर भगत (वय 20 वर्ष) व अविनाश नवरखेडे, दोघेही रा. हिंगणघाट, यांच्या ताब्यातून सुझुकी कंपनीची SS4 गाडी (MH 01 AH 838) जप्त करण्यात आली. या गाडीतून देशी दारूच्या 90ml च्या 2400 बाटल्या (24 खरड) मिळून आल्या. प्रत्येक बाटलीची किंमत ₹100 प्रमाणे एकूण 2,40,000 किंमतीची दारू आणि गाडी मिळून 7,40,000 किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.

सदर आरोपींवर महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम 65(अ,इ), 77(अ), 83 सह कलम 3(1) तसेच मोटार वाहन कायदा कलम 130, 177, 181 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही कारवाई मा. उपविभागीय पोलीस अधिकारी सुशीलकुमार नायक यांच्या नेतृत्वात, प्रभारी ठाणेदार स.पो.नि. संगीता हेलोडे यांच्या मार्गदर्शनाखाली, पो.हवा. अनिल केकतपुरे, दिलीप पवार, दीपक हाके, व कृष्णा माने यांनी केली.

हिंगणघाट पोलिसांच्या तात्काळ कारवाईमुळे अवैध दारू वाहतूक करणाऱ्यांना धडा मिळाला आहे.