
रेती चोरी करणाऱ्या ट्रक चालक व मालकावर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई — ₹20,00,000/- चा मुद्देमाल जप्त
रेती चोरीवर गुन्हे शाखेची धडक कारवाई
महामार्गावर अवैध रेती वाहतूक पकडली
ट्रक चालक-मालकावर गुन्हा दाखल
स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई
सेलू :
स्थानिक गुन्हे शाखा, वर्धा यांनी सेलू पोलीस स्टेशन हद्दीत बेकायदेशीरपणे रेती वाहतूक करणाऱ्या ट्रक चालक व मालकावर मोठी कारवाई करत ₹२०,००,०००/- किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, स्थानिक गुन्हे शाखेचे पथक सेलू येथे गस्त घालत असताना महामार्गावर बेंगनगाव नजीक संशयित ट्रक क्रमांक एम.एच. ३४ बी.जी. ३६५४ थांबवून तपासणी केली असता, त्या वाहनातून अंदाजे ८०० फुट अवैध रेती वाहतूक होत असल्याचे आढळले. पोलिसांनी तत्काळ ट्रक चालकास चौकशीसाठी ताब्यात घेतले असता, वाहनातील रेती बेकायदेशीरपणे नागपूर येथून आणल्याचे निष्पन्न झाले.
सदर प्रकरणात ट्रक चालक कमांक १) रिजवान हुसेन र. अमरावती तसेच मालक कमांक २) याच ट्रकचा धारक यांच्या विरोधात पोलीस स्टेशन सेलू येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईत जप्त करण्यात आलेल्या दोन ट्रकांसह रेतीचा एकूण ₹२०,००,०००/- किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक श्री. अनुराग जैन यांच्या मार्गदर्शनाखाली अपर पोलीस अधीक्षक सदाशिव वाघमारे, उपविभागीय पोलीस अधिकारी विनोद चौधरी, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सचिन बुरडे, तसेच भुषण निकाळजे, अमोल नागवडे, मंगेश चावरे व त्यांच्या पथकाने संयुक्तपणे केली.
स्थानिक गुन्हे शाखेच्या या धडाकेबाज कारवाईमुळे अवैध रेती वाहतुकीवर मोठा अंकुश बसला असून, पुढील तपास पोलीस स्टेशन सेलू करीत आहे.





