
वर्धा :
सेवाभावी संस्था प्रबोधन समितीच्या माध्यमातून समाज uplift करण्याच्या ध्येयाने महाराष्ट्रभर कार्य सुरू असून, समितीच्या नागपूर विभागाची पहिली कार्यशाळा दिनांक ५ ऑक्टोबर २०२५ रोजी वर्ध्यातील यशवंत महाविद्यालयात यशस्वीरीत्या पार पडली.
राज्याध्यक्षा डॉ. सौ. सुनिताताई मोडक यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यशाळेला नागपूर, वर्धा, चंद्रपूर, गोंदिया, भंडारा आणि गडचिरोली या सहा जिल्ह्यांमधून शेकडो सेवाभावी संस्था आणि संस्थाचालक उपस्थित होते.
कार्यशाळेत मोडकळीस आलेल्या संस्थांचे पुनर्वसन, शासकीय योजनांचे पुनर्वसन, आवश्यक कागदपत्रांची माहिती, CSR निधी उपलब्धतेचे मार्गदर्शन आदी विषयांवर सखोल चर्चा झाली.
प्रमुख पाहुणे म्हणून यशवंत महाविद्यालयाचे संस्थाध्यक्ष सन्मा. समीर देशमुख, दिवाणी वरिष्ठ न्यायाधीश सन्मा. विवेक देशमुख, तसेच वैद्यकीय जनजागृती मंचाचे अध्यक्ष डॉ. सचिन पावडे उपस्थित होते.
मार्गदर्शक म्हणून डॉ. मोडक, सन्मा. सतिश जगताप, संजय निर्मळ व सुनिल फुलारी यांनी मार्गदर्शन केले.
कार्यक्रमादरम्यान राष्ट्रपती पदक विजेती रश्मी वाळके यांचा सन्मान करण्यात आला तसेच नागपूर विभाग प्रकोष्ठ कार्यकारिणीची घोषणा राज्याध्यक्षा डॉ. मोडक यांनी केली.
या कार्यशाळेच्या आयोजनात सतिश जगताप, निताताई पांगुळ, संजय निर्मळ, अनिता बोरस्ते, प्रताप पवार, सुनिल फुलारी यांचे विशेष योगदान लाभले.
कार्यशाळेच्या यशस्वीतेबद्दल नागपूर विभागातील सर्व पदाधिकारी आणि सेवाभावी संस्थांचे मनःपूर्वक आभार मानण्यात आले.





