Home महाराष्ट्र रेहकीत संत अरुणबाबांचा सुवर्ण महोत्सवी पुण्यतिथी सोहळा, धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन 

रेहकीत संत अरुणबाबांचा सुवर्ण महोत्सवी पुण्यतिथी सोहळा, धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन 

97
Oplus_0

सेलू : –

नजिकच्या रेहकी येथील श्री संत अरुणबाबांच्या पुण्यस्मरण सोहळ्याला यंदा 50 वर्ष पूर्ण होत आहे. यानिमित्ताने पाच दिवस विविध प्रकारच्या धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

या सुवर्ण महोत्सवी पुण्यतिथी सोहळ्यानिमित्त जय दुर्गा उत्सव मंडळाच्या प्रांगणात भव्य सभामंडप उभारण्यात आलायं. याप्रसंगी आज शारदीय नवरात्रोत्सवाच्या पहिल्या दिवसापासून दररोज सायंकाळी सहा ते सात स्थानिक संत गोपिकाबाई भजन मंडळाच्या वतीने हरिपाठ सादर केला जाणार आहे. सोमवार ता.22 रोजी घटस्थापनेच्या दिवशी रात्री आठ ते दहा हभप खुशाल महाराज वैद्य, देवरी पेंढरी यांच्या भारूडाचा कार्यक्रम, मंगळवार ता.23 रोजी रात्री आठ ते दहा हभप माऊली महाराज मुरेकर, आळंदी यांचे कीर्तन, बुधवार ता. २४ रोजी रात्री आठ ते दहा हभप विनोदाचार्य रमेशपंत दुधे महाराज, दारव्हा यांचे कीर्तन आयोजित करण्यात आले आहे.

ललितापंचमीच्या आदल्या दिवशी गुरुवार ता.25 रोजी सकाळी नऊ वाजता गोपिकाबाई भजन मंडळाच्या वतीने संत अरुणबाबा मंदिरात घट आणि टाळ बसविणे, रात्री आठ ते दहा शिवचरित्रकार किशोर महाराज ठाकरे, आळंदी यांचे कीर्तन व त्यानंतर स्थानिक भजनी मंडळाच्या भजनांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. शुक्रवार ता.26 रोजी सकाळी नऊ ते अकरा टाळ उतरविणे, अकरा वाजता होम पूजा, दुपारी बारा वाजता हभप भागवताचार्य गजानन कपिले महाराज, आळंदीकर यांचे काल्याचे कीर्तन, दुपारी तीन वाजता दिंडी व पालखी सोहळा आणि त्यानंतर सायंकाळी पाच वाजता समाधी स्थळी आरती व दहीहंडीचा कार्यक्रम पार पडणार आहे. सदर पालखी व दिंडी सोहळा मंदिरात परत येताच आरती आणि त्यानंतर महाप्रसादाच्या कार्यक्रमाने सुवर्ण महोत्सवी पुण्यतिथी सोहळ्याची सांगता होईल. या कार्यक्रमाचा भाविकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन संत अरुणबाबा सुवर्ण महोत्सवी पुण्यतिथी सोहळा आयोजन समितीच्या वतीने करण्यात आले आहे.