
नगरपंचायत चा अनोखा कारभार
अतीक्रमणधारक सदस्यावर कारवाईची मागणी
सेलू :-
नगरपंचायत चे मासीक सभेत चर्चा करण्यात आलेल्या ठरावाची प्रोसिडिंगमध्ये नोंद न घेतल्याने आणि त्यावर अद्यापही कारवाई झाली नसल्याने भाजपच्या तीन नगरसेवकांनी नाराजी व्यक्त केली आहे. एका सेवाभावी संस्थेच्या नावाने नगर पंचायतीच्या जागेवर अतिक्रमण करून बांधकाम करणाऱ्या नगरसेवकाचे सदस्यत्व रद्द करण्यात यावे. तसेच झालेले बांधकाम नगरपंचायतने त्वरित ताब्यात घ्यावे. अन्यथा २२ सप्टेंबरपासून नगर पंचायत कार्यालयापुढे उपोषणाला बसू, असा इशारा भाजपच्या तीन महिला नगरसेविकांनी मुख्याधिकारी यांना दिलेल्या निवेदनाद्वारे केली आहे..
सेलू नगरपंचायतीत सध्या अनागोंदी कारभार सुरू आहे. मुख्याधिकाऱ्यांचा एकाधिकार सुरू आहे. सभेत झालेले ठराव अंमलात आणले जात नसून, ठरावाच्या बाजूने केलेल्या विरोधी नगरसेवकांच्या मतांची नोंदही घेतली जात नाही. मुख्याधिकाऱ्यांच्या या कार्यप्रणालीवर अनिता हांडे, मनीषा भलावी व वेणू राऊत या भाजपच्या तीन महिला नगरसेविकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. येथे १३ ऑगस्ट २०२५ रोजी झालेल्या सभेत नगरपंचायत कार्यालय शिवपार्वती मंगल कार्यालयात स्थानांतरीत करण्याबाबत विषय चर्चेला ठेवला होता नगरपंचायतने विषयानुसार आलेल्या ठरावावर चर्चेत सहभागी होत या तिन सदस्यांनीआपली मते मांडली पण प्रोसीडिंग मध्ये त्याचा कुठेही उल्लेख आढळून आला नसल्याचे आरोप केला आहे. यात नगरसेवक राजेश जयस्वाल यांनी नगर पंचायतीच्या जागेवर शंकरजी देवस्थान ट्रस्ट चे आड शिवपार्वती मंगल कार्यालयाचे बांधकाम केले. ती जागा नगरपंचायतीच्या मालकीची असून तिथे त्या जागेवर शिवपार्वती मंगल कार्यालयाचे बांधकाम केले आहे ते ताब्यात घेऊन तिथे नगरपंचायत कार्यालय स्थानांतरित करावे. झालेल्या चुकीची माफी मागून नोंदविलेल्या मतांची प्रोसीडिंग मध्ये नोंद घेण्यात यावी अशी त्यांची मागणी आहे. संबंधित ठरावांस एक महिना उलटूनही नगर परिषद प्रशासनाने ठोस कारवाई केलेली नाही. याबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी हस्तक्षेप करून उपाययोजना कराव्यात तसेच शासकीय जमिनीवर बेकायदेशीर अतिक्रमण करणाऱ्या नगरसेवक राजेश जयस्वाल यांचे सदस्यत्व रद्द करावे, यावर त्वरित निर्णय न झाल्यास घटस्थापनेच्या दिवशी येत्या 22 सप्टेंबर पासून उपोषणास बसण्याचा इशारा या तिन महिला नगरसेवीकांनी दिला आहे.
सीओ प्रतिसाद देईना
या प्रकरणाविषयी मुख्याधिकारी अनुप अग्रवाल यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही.





