
अँग्रीकोज वेलफेअर सोसायटीचा उपक्रम
सेलू :–
तालुक्यातील मागील वर्षी सन 2025 मधील आत्महत्या ग्रस्त कुटुंबातील सदस्यांना शेतीउपयोगी साहीत्य व उद्योग उपयोगी साहित्याचे वाटप करण्यात आले तसेच साल ईपेवठ, सोंडी,गोहदा येथील जि प शाळेतील 54 विद्यार्थ्यांना शालेपयोगी साहित्याचे वाटप करण्यात आले अँग्रीकोज वेलफेअर सोसायटी नागपूर तर्फे साल ईपेवठ येथील जि प प्राथमिक शाळेत गुरूवारी ता 12ला या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी साल ई पेवठ ग्रामपंचायतीच्या सरपंचा तळवेकर होत्या कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून सडक अर्जूनीचे माजी आमदार मनोहर चंद्रीकापुरे ,सुभाष पाणसे, विजय तपाडकर, गजानन देवळीकर, गावातील प्रतिष्ठीत देवेंद्र भेंडारे, विनोद घाटोळे, निलेश राऊत, रामदास ठाकरे, सुधीर खरवडे, बाबा सोनटक्के यांची उपस्थिती होती यावेळी बोलताना माजी आमदार चंद्रीकापुरे यांनी समाजातील कमकुवत गरजवंताना मदतीचा हात देण्यासाठी पावले उचलण्याची गरज असल्याचे मत व्यक्त केले याप्रसंगी सुभाष पाणसे यांनी संंस्थेच्या या कार्याबद्दल माहीती देत कौतुक केले कार्यक्रमाचे प्रास्ताविक तपोडकर यांनी केले संचालन मिलिंद हनवंते यांनी केले कार्यक्रमाला शिक्षक धनवार, रामटेके, माहुरे, खोब्रागडे, अंधारे तसेच गावातील नागरिक उपस्थित होते.





