Home वर्धा संत जगनाडे महाराज पुण्यतिथी उत्सव; दिंडी व पालखी सोहळ्याने वातावरण भक्तिमय

संत जगनाडे महाराज पुण्यतिथी उत्सव; दिंडी व पालखी सोहळ्याने वातावरण भक्तिमय

317

सेलू :–

घोराड येथील श्री संत जगनाडे महाराज पुण्यतिथी उत्सवानिमित्त मंगळवारी दिंडी व पालखी सोहळ्याने वातावरण भक्तिमय झाले होते सकाळी अकरा वाजता मंदिरातून भजनी मंडळीसह हरिनामाचा जयघोष करीत पालखी सोहळ्याला सुरवात झाली मंदिरातून निघालेली दिंडी पालखी मुख्य मार्गाने विठ्ठल रुक्मिणी मंदिराजवळ आली त्यानंतर मुख्य मार्गाने जगनाडे महाराज मंदिरात जाताच या सोहळ्याची सांगता झाली या पुण्यतिथी उत्सवानिमित्त मंदिरात विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

या पुण्यतिथी उत्सवानिमित्त बुधवारी ता १७ ला भजन, गोपालकाल्याचे किर्तन तथा महाप्रसादाचे वितरण करण्यात येणार आहे दरवर्षी हा उत्सव साजरा करण्यात येतो या कार्यक्रमाचे आयोजनासाठी मंडळाचे पदाधिकारी तथा परिसरातील नागरीकांचे सहकार्य लाभले.