Home वर्धा अल्पवयीन मुलीस पळून नेणारे पोलिसांच्या ताब्यात

अल्पवयीन मुलीस पळून नेणारे पोलिसांच्या ताब्यात

324

सेलू पोलिसांनी छत्तीसगढ येथून घेतले आरोपीस ताब्यात

सेलू : – पंकज तडस 

अल्पवयीन मुलीस पळवून नेणाऱ्यास सेलू पोलिसांनी छत्तीसगड राज्यातील दुर्गम भागातून अटक केली. सेलू पोलिसांत सुनीता आनंद पाटील यांनी मुलीला फूस लावून पळवून नेल्याबाबत तक्रार दाखल केली होती. या प्रकरणी तक्रार दाखल केल्यानंतर तपासादरम्यान ठाणेदार मनोज गभणे यांच्या मार्गदर्शनात पोलिसांनी तपास चक्रे फिरवून, तांत्रिक पद्धतीने तपास करून पीडिता व आरोपीचा हानफारसी, जि. कांकेर छत्तीसगड अशा दुर्गम भागातजाऊन शोध बिट्टू नकुल पांडे (वय ३१) रा. हानफारसी, पखांजुर, राज्य छत्तीसगड याच्या ताब्यात मिळून आल्याने पोलिसांनी अटक केली. असून पुढील तपास सेलू पोलिस करीत आहेत. ही कारवाई पोलिस अधीक्षक अनुराग जैन, अपर पोलिस अधीक्षक सागर कवडे, उपविभागीय पोलिस अधिकारी प्रमोद मकेश्वर यांच्या मार्गदर्शनात मनोज गभणे यांच्या निर्देशाप्रमाणे किरण महाजन, सुरेश मडावी, ज्ञानदेव वनवे, मयुरी पांचाळ यांनी केली.