Home Breaking News विदर्भ महसूल सेवक संघटनेचे तहसिल कार्यालयासमोर धरणे 

विदर्भ महसूल सेवक संघटनेचे तहसिल कार्यालयासमोर धरणे 

193

मुख्य संपादक :– पंकज तडस ( 9975765632 )

सेलू :–

महसूल सेवक कोतवाल पदास चतुर्थ श्रेणी कर्मचार्‍याचा दर्जा देण्यात यावा यासाठी विदर्भ महसूल सेवक संघटनेचे वतीने येथील तहसिल कार्यालयासमोर गुरूवारी ता 11 ला धरणे आंदोलन करण्यात आले यावर त्वरित तोडगा न निघाल्यास महसुल मंत्री यांचे क्षेत्रातील कोराडी येथील क्रिडा संकुल मध्ये बेमूदत काम बंद आंदोलन तथा धरणे आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे

राज्यातील महसूल सेवक हा कणा आहे विभागातील अंतत्य महत्त्वाचा समजल्या जाणार्‍या या महसूल सेवक कोतवाल यांचे कार्य तसेच शासनाच्या योजना, धोरणे, उपाययोजना अंतीम घटकापर्यत पोहचविण्याचे काम ते करीत असते 24 तास शासकीय सेवा देत असून आपल्या जबाबदार्‍या पार पाडत असतो परंतु अद्यापही महसूल सेवक पदास शासनाच्या वर्गिकृत कर्मचाऱ्यांप्रमाणे सेवा सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या नाहीत हा या महसूल सेवक कोतवाल यांचे वर अन्याय आहे त्यांचे महसूल यंत्रणेतील स्थान व कार्य पाहता त्यांना इतर महसूल कर्मचार्‍यांप्रमाणे सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी चतुर्थ श्रेणी कर्मचारी म्हणून नियुक्ती देण्यात यावी अशी मागणी महसूल सेवक संघटनेचे वतीने करण्यात आली आहे यावेळी मागणीचे निवेदन तहसीलदार सेलू यांना सादर करण्यात आले आहे यावेळी महेश निघेकर, राहुल तडस, नितीन भांडेकर, संदीप मुडे, सुरज नागोसे, आकाश मापारी, पंकज मणीक यांची उपस्थिती होती.