Home Breaking News रामनगर हद्दीत स्थानिक गुन्हे शाखेची धडक कारवाई

रामनगर हद्दीत स्थानिक गुन्हे शाखेची धडक कारवाई

96

चारचाकीसह देशी-विदेशी दारू जप्त ; २.१६ लाखांचा मुद्देमाल हस्तगत

वर्धा :–

स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने रामनगर पोलिस ठाणे हद्दीत कारवाई करत चारचाकी वाहनासह देशी-विदेशी दारूचा साठा जप्त केला. या कारवाईत एकूण २ लाख १६ हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे.

स्थानिक गुन्हे शाखेला मिळालेल्या गुप्त माहितीनुसार, नागठाणा येथील सुशांत खोब्रागडे हा आपल्या साथीदारासह अमरावती जिल्ह्यातून अवैधरीत्या मोठ्या प्रमाणात दारूसाठा घेऊन वर्ध्याकडे येत होता. या माहितीच्या आधारे रामनगर येथील नागठाणा रोडवर नाकाबंदी करण्यात आली.

पोलिसांनी संशयित मारुती अल्टो कार (MH 30 L 5890) अडवून तपासणी केली असता वाहनामध्ये देशी दारू व बिअरच्या ८ पेट्या आढळून आल्या. पोलिसांनी वाहनासह संपूर्ण मुद्देमाल जप्त केला.

या प्रकरणी सुशांत राजू खोब्रागडे (वय २५, रा. नागठाणा) व अमोल लक्ष्मण माने (वय २७, रा. गौरक्षण वार्ड, वर्धा) यांच्याविरुद्ध रामनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल, अपर पोलीस अधीक्षक सदाशिव वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. तसेच पोलीस निरीक्षक विनोद चौधरी, पोलीस उपनिरीक्षक राहुल ईटेकर, पोलीस अंमलदार सचिन इंगोले, भूषण निघोट, प्रमोद पिसे, अमोल नगराळे, मंगेश चावरे, अरविंद इंगोले यांनी कारवाईत सहभाग घेतला.