
सेलू :–
संजय गांधी निराधार समिती, सेलूच्या अध्यक्षपदी अशोक मुडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या नियुक्तीमुळे निराधार, गरजू व वंचित घटकांसाठी राबविल्या जाणाऱ्या योजनांना अधिक गती मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
सामाजिक कार्याचा प्रदीर्घ अनुभव, प्रशासकीय समन्वय आणि लोकाभिमुख दृष्टिकोन यामुळे मुडे यांचे कार्य सर्वपरिचित आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली समितीच्या कामकाजात पारदर्शकता, कार्यक्षमता आणि लाभार्थ्यांपर्यंत योजनांचा थेट लाभ पोहोचविण्यावर भर दिला जाईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
या नियुक्तीबद्दल विविध सामाजिक, राजकीय व स्वयंसेवी संघटनांकडून अभिनंदनाचा वर्षाव होत असून, निराधार कुटुंबांच्या हितासाठी ठोस व परिणामकारक निर्णय घेतले जातील, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.





