Home महाराष्ट्र सूर्यधरमची खेळाडूचीं राष्ट्रीय स्पर्धेत निवड

सूर्यधरमची खेळाडूचीं राष्ट्रीय स्पर्धेत निवड

102
Oplus_131072

कु. योगिनी नामदेव राठोड हरियाणा येथे करणार राज्याचे प्रतिनिधित्व

सेलू  :–

सेलू येथील सूर्यरम स्पोर्टींग क्लब चीं खेळाडू ही महाराष्ट्र राज्याचे प्रतिनिधित्व करसाठी हरियाणा येथे राष्ट्रीय स्पर्धेत सहभाग नोंदविणार आहे. युवक व क्रीडा संचलनायक महाराष्ट्र राज्य पुणे डेरवण रत्नागिरी येते नुकत्याच झालेल्या राज्यस्तरीय मैदानी स्पर्धेत 19 वर्षातील वयोगटात कु. योगिनी नामदेव राठोड हिने पदक पटकावून आपल्या दमदार खेळाचे प्रदर्शन करीत राज्यस्तरीय शालेय मैदानी स्पर्धेत आपला दबदबा कायम ठेवला व ग्रामीण भागातील नारी शक्ती कुठेही कमी नसल्याचे सिद्ध करून दाखविले. दिनांक २९ ते ३० नोव्हेंबर २०२५ भिवणी हरियाणा येथे होणाऱ्या राष्ट्रीय क्रॉस कंट्री स्पर्धे स्पर्धेसाठी कु. यशस्वी नामदेव राठोड निवड झाली आहे. या कामगिरीने राष्ट्रीय पातळीवर जिल्ह्याचे व राज्याचे नाव चमकाविले आहे. कु. योगिनी नामदेव राठोड हिला सूर्यधरम स्पोर्टिंग क्लब सेलूचे प्रशिक्षक सागर राऊत. समीर सय्यद यांचे मार्गदर्शन लाभले, याकरिता शहरातील अणेक मान्यवरांनी तसेच सूर्यधराम स्पोर्टींग क्लबचे अध्यक्ष ऍड आर. एस. लिल्हारे आणि सचिव प्रवीण इंगडे यांनी कु. योगिनी नामदेव राठोड हिचे अभिनंदन केले.