Home महाराष्ट्र तासाभरात चोरीप्रकरणात दोघांना अटक  

तासाभरात चोरीप्रकरणात दोघांना अटक  

76

 गुन्हे शोध पथकाची कारवाई 

सेलू – 

पोलिसांनी अवघ्या तासाभरात चोरी प्रकरणचा छडा लावत दोघांना ताब्यात घेऊन अटक केली. दोघांकडून ५० हजार रुपये रोख रकमेसह मोबाईल, दुचाकी असा ९६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. सेलू पोलिस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने ही कारवाई केली.

मदनी येथील फिर्यादी आपले परिवारासह हाडपक्या गणपती विसर्जनाकरीता गेल्या होत्या. घराचे दार उघडे असल्याची संधी साधून वृषभ गजानन निधेकर रा. आर्वी नाका वर्धा, कार्तीक विठ्ठलराव भोमले रा. हावरे ले आऊट, सेवाग्राम ता. जि. वर्धा यानी घरी कोणीही नसल्याचा फायदा घेऊन घरात प्रवेश करुन हॉलमध्ये असलेल्या लोखंडी कपाटाचे दार झटक्याने तोडले. कपाटात असलेल्या पर्समधून ५० हजार रुपये संगनमत करुन लंपास केले. तक्रारीवरुन सेलू पोलिस ठाण्यात चोरीचा गुन्हा नोंद करण्यात आला. घटनेची माहिती प्राप्त होताच गुन्हे पथकाने शोध सुरू केला. अवघ्या एका तासात आरोपींना शिताफिने पकडून चोरीस गेलेले ५० हजार रुपये,  मोटारसायकल, दोन मोबाईल असा ९६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली. ही कारवाई पोलीस अधीक्षक अनुराग जैन, अपर पोलीस अधीक्षक वाघमारे, उपविभागीय पोलीस अधीकारी मकेश्वर यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक मनोज गभणे यांच्या प्रत्यक्ष मार्गदर्शनात मनोहर मुडे, अखीलेश गव्हाणे, सचीन वाटखेडे, विनायक गोडे यांनी केली. पोलिसांचा पुढील तपास सुरू आहे.