Home महाराष्ट्र मुख्याधिकारी यांच्या आश्वासनानंतर त्या तिन महीला नगरसेविकांचे बेमुदत उपोषण मागे 

मुख्याधिकारी यांच्या आश्वासनानंतर त्या तिन महीला नगरसेविकांचे बेमुदत उपोषण मागे 

62

सेलू :-

नगरपंचायत चे मासीक सभेत चर्चा करण्यात आलेल्या ठरावाची प्रोसिडिंगमध्ये नोंद न घेतल्याने आणि नंगरपंचायतच्या जागेवर अतिक्रमण करणाऱ्या नगरसेवकावर कारवाई व्हावी या मागणीसाठी तिन महिला नगरसेवीकांनी नगरपंचायत कार्यालया समोर सुरू केलेले बेमुदत उपोषण मुख्याधिकारी यांच्या लेखी आश्वासनानंतर मागे घेण्यात आले

भाजपच्या तीन नगरसेवकांनी सोमवार ता 22 पासून नगरपंचायत समोर बेमुदत उपोषण सुरू केले होते . एका सेवाभावी संस्थेच्या नावाने नगर पंचायतीच्या जागेवर अतिक्रमण करून बांधकाम करणाऱ्या नगरसेवकाचे सदस्यत्व रद्द करण्यात यावे. तसेच झालेले बांधकाम नगरपंचायतने त्वरित ताब्यात घ्यावे. अशी मागणी सेलूतील अनिता हांडे, मनीषा भलावी, वेणू राऊत या नगरसेवकांनी केली होती याकडे नगरपंचायत कडून दुर्लक्ष होत असल्याने या तिन महिला नगरसेवीकांनी सोमवार २२ सप्टेंबरपासून नगर पंचायत कार्यालयापुढे बेमुदत उपोषण सुरू केले होते या उपोषण मंडपाला भेट देत नगरसेविका रूक्साना पठाण, संदिप सांगोळकर, किशोर इरपाते यांनी पांठीबा देत आपला यात आपला सहभाग नोंदवला होता शेवटी दुपारी चार वाजता मुख्याधिकारी अनुप अग्रवाल , तथा नगराध्यक्ष स्नेहल देवतारे यांनी उपोषण मंडपाला भेट देत यावर चर्चा करून या जागेची भूमीअभिलेख कडुन जलद मोजणी करून अतीक्रमण असेल तर त्वरित कारवाई करू यासाठी 20 दिवसाचा अवधी मागितला तसेच या विषयावर 24 सप्टेंबरला विशेष सभेचे आयोजन करण्यात आले आहे मुख्याधिकारी यांच्या लेखी आश्वासनानंतर या उपोषणाची सांगता करण्यात आली यावेळी नगरसेवक राजेद्र मिश्रा, दिनेश माहुरे यांची उपस्थिती होती.