Home महाराष्ट्र मुख्यमंत्री समृध्द पंचायत राज अभियानास आज केळझर येथून प्रारंभ 

मुख्यमंत्री समृध्द पंचायत राज अभियानास आज केळझर येथून प्रारंभ 

171
Oplus_131072

राज्यातील ग्रामविकासात नवचैतन्य

सेलू :-

महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास व पंचायतराज विभागामार्फत मुख्यमंत्री समृध्द पंचायत राज अभियान दिनांक १७ सप्टेंबर ते ३१ डिसेंबर या कालावधीत राबविण्यात येणार आहे.तालुक्यात या अभियानाचा शुभारंभ आज बुधवार ता 17 ला केळझर येथून होत आहे पंचायत राज संस्थांद्वारे ग्रामविकासाला चालना देणे, लोकशाही बळकट करणे तसेच ग्रामपातळीवर विकासाच्या कामांना गती देणे हा अभियानाचा मुख्य उद्देश आहे.

या अभियानाअंतर्गत सुशिक्षित युवक पंचायत तयार करणे, पंचायत राज संस्थांना आर्थिक दृष्ट्या सक्षम करणे, ग्रामसभेतून विकास आराखडे तयार करणे, पाणीपुरवठा व अन्य योजनांची अंमलबजावणी करणे, उद्योजकता विकासाला चालना देणे व लोकशाहीसाठी प्रभावी माध्यम उभारणे या मुद्द्यांवर विशेष भर दिला जाणार आहे.

याबाबत जिल्हा व तालुका स्तरावर कर्मचारी, ग्रामसेवक, रोजगार सेवक व ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांची बैठका घेऊन प्राथमिक मार्गदर्शन करण्यात आले आहे. तसेच प्रत्येक तालुक्यात ग्रामपंचायतीवर या अभियानासाठी संपर्क अधिकारी नियुक्त करण्यात आले आहेत.

दि 16 सप्टेंबर रोजी गावात जनजागृती करण्यासाठी ग्रामपंचायत स्तरावर सरपंच, सदस्य, स्वयंसेवी संस्था, महिला बचत गट व आशा सेविका यांच्या उपस्थितीत अभियानाची माहितीपर फेरी काढण्यात आली.

यात सर्वोत्कृष्ट ठरलेल्या तालुक्यातील तिन ग्रामपंचायतींना पारितोषिके देखील देण्यात येणार असून, तालुकास्तरावर प्रथम येणाऱ्या ग्रामपंचायतीला अनुक्रमे १५ लाख, 12 लाख, 8 लाखांचे पारितोषिक मिळणार आहे.याशिवाय ग्रामपंचायत स्तरावर दोन विशेष पुरस्कार देण्यात येणार आहे 100 गुणांचे हे अभियान असून कामाचे मूल्यमापन होणार आहे ग्रामपंचायतीला मोठ्या प्रमाणावर पुरस्कार देणारे हे पहिले अभियान आहे.

या अभियानामुळे ग्रामविकासाच्या कामांना वेग येऊन ग्रामपंचायती सक्षम व प्रभावी बनतील, असा विश्वास गटविकास अधिकारी देवानंद पाणबुडे यांनी येथे आयोजित पत्रकार परिषदेतून व्यक्त केला सगळ्यांनी सहभागी व्हावे असे आवाहन गटविकास अधिकारी देवानंद पाणबुडे, सहाय्यक रामचंद्र चोपडे यांनी केले आहे