
सेलू :–
तालुक्यातील हिंगणी येथे सोमवारी रात्रीला वीज पडल्याने यात शेतातील कोठा जळाला यात संपुर्ण साहित्य जळून खाक झाले असून एक बैल गंभीर जखमी झाला
सोमवारी रात्री १२ वाजताचे दरम्यान विजेच्या कडकडाटासह पाऊस पडला यात हिंगणी येथील प्रकाश शरद खडगी यांचे मौजा हिंगणी सर्व न १७०, या शेतातील कोठ्यावर झेपावली या विजेमुळे आग लागल्याने गोठयातील डवरा जाडी लाकडी साहित्य चनाचे कूटार ,ज्वारी कडबा पाईप व इतर साहित्य जळून खाक झाले यात अंदाजे नु एक लाख रुपयांचे नुकसान झाले आहे या घटनेची माहिती तलाठी खंडाळे व ग्राम सेवक यांना फोन करून दिली पण पंचनामा करण्याकरीता मंगळवारी सायकांळ पर्यंत कुणीही पोहचले नाही पंचनामा करण्याकरीता विलंब होत असल्याने याबद्दल शेतकर्यांत नाराजीचा सूर उमटत आहे.






