यशवंत विद्यालय वाडफड येथे रक्तदाता दिनानिमित्त रक्तदान शिबीर

23

वर्धा :-

बजाज कृषी महाविद्यालय, पिपरी, वर्धा यांच्या द्वारे गावा गावांमध्ये सुरू असलेल्या ग्रामीण जागरूकता व कार्यानुभव २०२५-२६ शैक्षणिक सत्रात वायफड येथे कृषीदुतांनी जागतिक रक्तदाता दिन साजरा करत रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले . यशवंत महाविद्यालयाचे प्रभारी मुख्याध्यापक प्रशांत वडाळकर हे कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी होते माजी सैनिक मधवप्रसाद‌जी दुबे यांच्या हस्ते या शिबिराचे उद्घाटन करण्यात आले.

जिल्हा रुग्णालय, वर्धा यांच्या सानिध्यात या शिबिराला येथे उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. यासाठी जनसंपर्क अधिकारी प्रवीण गावंडे, डॉ. केशव यादव, किशोर महाजन, वैशाली जगताप आणि अंकुश कांचनपुरे यांचे सहकार्य लाभले . जागतीक रक्तदाता दिनाच्या निमित्ताने येथे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमामध्ये वायफड गावकऱ्यांनी कृषीदुतांसह रक्तदान शिबिरामध्ये “रक्तदान हेच श्रेष्ठदान” या वाक्याला साजेसा सहभाग देत रक्तदान करत हा कार्यक्रम पार पाडला. .

या कार्यक्रमाला बजाज कृषी महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. स्नेहल देशमुख, प्राध्यापक राजेंद्र खरचे तसेच कार्यक्रम समन्वयक डॉ. मंगेश घोडे, डॉ. कविता चोपडे व कृषी विस्ताराच्या शिक्षिका डॉ. राणी मोरे यांचे मार्गदर्शन लाभले आहे. वायफड गावात कृषिदुत असलेले आयुष सोमनाथे, रोहित वाघमोडे, कृष्णा वैद्य, ऋतिक विरुटकर, युगल रखुंडे, ज़हिर शेख़ आणि समीरण यांची उपस्थिती होती. यामध्ये प्रामुख्याने शेती, गाव आणि गावकरी याच्यासोबतच खरीप हंगामाचे नियोजन आणि कार्य याविषयी माहिती देण्यात आली .