मुख्य संपादक :– पंकज तडस ( 9975765632 )
शेतकर्यांना सूचना न देता केले पोल उभे
ठेकदाराचा मनमानी कारभार
अंडर ग्राउंड पाईप लाईन फोडली
सेलू :-
शेतकरी शेतजमीनीचा मालक असतांना हिंगणी घोराड रोडलगत नविन पोल उभे ठेकेदाराकडून संबधीत शेतकर्यांस कोणतीही सुचना न देता नवीन वहिनीचे हे पोल शेतकर्यांच्या हद्दीतील अंडरग्राउड पाईप लाईन फोडून उभे केल्याने यात संबधीत शेतकर्यांला मोठ्या नुकसानीला तोंड द्यावे लागत आहे ठेकेदाराचे या अशा मनमानी कारभारामुळे शेतकरी पुरता वैतागला असून यावर संबधीत वीज वितरणचे अधिकार्यांचा अंकुश नसल्याचे दिसून येत आहे
सध्या हिंगंणी ते घोराड रोडवर रस्त्याचे एका बाजूला नव्याने वीजेचे पोल उभे करीत लाईन टाकण्यात येत आहे यात घोराड जवळ धोंगडे यांचे शेतालगत हे राहीलेले पोल उभे करताना शेतीची पेरणीसाठी संपूर्ण वाहीपेरी मशागत झाल्यानंतर शेतातून अवजड वाहने टाकत शेतकरयांचेधुरर्यावर त्यांचे हद्दीत हे पोल उभे केले गेले एवढेच नव्हे तर येथे गड्डे करतांना त्यांची अंडर ग्रांउड असलेली पाईपलाईन फोडली तर एका ठिकाणी मोठा गड्डा तो न बुजवता तसाच टाकून दिला ऐन हंगामाचे तोंडावर शेतीची पेरणीसाठी पुर्ण मशागत झाली असताना ठेकेदाराने शेतकर्यांस कोणतीही पूर्वसूचना न देता मनमानी पद्धतीने हे काम केले यामुळे संबधीत शेतकर्यांचे मोठे नुकसान झाले आहे तसेच झाडांचे फांद्याची कटाई करत ते तसेच शेतात टाकून दिल्याने शेतकर्यांची हंगामाचे तोंडावर पंचाईत झाली आहे ठेकेदारानी शेतकर्यांचा विचार न करता केलेले हे कृत्य बेकायदेशीर असून शेतकर्यांचे या नुकसानीला जबाबदार कोण असा सवाल येथे उपस्थित केला जात आहे याबाबत संबधीत शेतकर्यांने वीजवितरण कंपनीकडे तक्रार दाखल केली असून नुकसान भरपाईची मागणी केली आहे वरिष्ठांनी याची गांभीर्याने दखल घेत या कामाची चौकशी करून संबधीत दोषीवर कारवाई करावी अशी मागणी केली जात आहे.