Home महाराष्ट्र जय जय राम कृष्ण हरी च्या गजरात दिंडीचे पंढरपूर कडे प्रस्थान

जय जय राम कृष्ण हरी च्या गजरात दिंडीचे पंढरपूर कडे प्रस्थान

286

पाऊले चाललेती पंढरीचे वाट…!

प्रती पंढरीतून पायदळ दिंडीचे पंढरपूर कडे प्रस्थान

घोराड :–

माऊली – माऊली चा गजर, टाळ मृदंगाचा निनाद, संत केजाजी महाराजांच्या नावाचा जयघोष करीत हातात भगव्या पताका , डोक्यावर तुळशी वृंदावन घेऊन वारकरी प्रती पंढरीतून पंढरपूर कडे मार्गस्थ झाले.

हरि महाराज महाकाळकर हे दिंडी चालक असून संत नामदेव केजाजी महाराज दिंडी चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने आयोजित पायदळ दिंडीचे हे ८ वे वर्ष आहे.

या दिंडीत रथाचा समावेश असून या रथामध्ये विठ्ठल रुखमाई व संत केजाजी महाराज यांच्या मूर्ती असलेल्या रथाचे चालक पांडुरंग तडस, गजानन महाकाळकर, केशव झाडे, बंटी महाकाळकर, पंढरी वरटकर, सूर्यभान धोंगडे, चेतन राऊत आहे. हा रथ बैलजोडीचा साहाय्याने सावंगी मेघे येथील चमत्कारी हनुमान मंदिर पर्यंत जाणार असून नंतर रथ चालक हा रथ पंढरपूर पर्यंत नेत आहे.

दिंडीचे रात्रीचे मुक्काम. सावंगी मेघे, रत्नापुर, कळंब, यवतमाळ, हीवरी, आर्णी, दही सावळी, गुंज, काकड दाती, पिंपरी, माळेगांव फाटा, हिंगोली, औंढा, आडगाव, परभणी, पोखरणी, गंगाखेड, परळी वैद्यनाथ, वरवटी फाटा, दिगुळ आंबा, माळेगांव, परतापुर, पाथरी, बार्शी, वाडाशिंगी, शेटफळ, येथे रात्रीचा मुक्काम राहणार आहे. शेगाव धुमाला पंढरपूर येथील संत केजाजी महाराज मठ येथे दिंडी मुक्कामास राहणार आहे.

२८ दिवस चालणार वारकरी पायदळ

उन्ह वारा पाऊस याचा सामना करीत वारकरी पांडुरंगाच्या दर्शनाच्या ओढीने २८ दिवस हरी नामाचा जप करीत पायदळ चालत पंढरपुरात पोहचणार आहे. आषाढी एकादशी ला दिंडीतील वारकरी पांडुरंगाचे दर्शन घेतल्यानंतर दिनांक १० जुलै रोजी दिंडी परतीचा प्रवास करणार आहे.

दिंडी ने दिनांक ६ रोजी गावातील प्रमुख मार्गाने विठ्ठल रखुमाई देवस्थान परिकोट ला प्रदक्षिणा करीत मंदिराजवळ असणाऱ्या भवानी मंदिरात रात्री मुक्काम करून दिनांक ७ रोजी सकाळी भवानी मंदिरात हरिनामाचा गजर करीत पंढरपूर कडे प्रस्थान केले.