मालवाहू वाहनाची दुचाकीला धडक, एक गंभीर जखमी 

398

सेलू :-

नागपूर कडे जाणार्‍या दुचाकीवाहनाला मागाहून आलेल्या मालवाहू वाहनाने धडक दिल्याने झालेल्या अपघातात दुचाकी र-वार गंभीर जखमी झाल्याची घटना शनिवारी दुपारी सेलू बायपासवर उघडकीस आली जिवन मोरेश्वर नरांजे वय 44 असे गंभीर जखमी झालेल्या इसमाचे नाव आहे

सुकळी स्टेशन येथील जिवन नरांजे हा आपल्या दुचाकी वाहन क्रमांक एम एच 32 ऐजी 8760 ने सुकळी येथून केळझरकडे जात असताना मागाहुन वर्धेकडून येणाऱ्या मालवाहू वाहन क्रमांक एम एच 40सीटी6715 ने धडक दिली यात दुचाकी स्वार हा गंभीर जखमी झाला घटनेची माहिती मिळताच रुग्णमित्र प्रज्वल लटारे यांनी घटनास्थळी धाव घेत जखमींस रुग्णवाहिकेने उपचारासाठी सेवाग्राम रूग्णालयात दाखल केले या घटनेची सेलू पोलिसात नोंद आहे.