
सेलू :–
स्थानिक श्री संत केजाजी कॉन्व्हेन्ट घोराड येथे स्त्री शिक्षणाच्या प्रनेत्या, क्रांती ज्योती सावित्री बाई फुले यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी विद्यार्थ्यांनी सावित्री बाई फुले, जोतिबा फुले यांची वेशभूषा परिधान केली होती.सर्वप्रथम शाळेचे संस्था संचालक तथा मुख्याध्यापक प्रशांत झाडे, शाळेतील शिक्षिका यांनी क्रांती ज्योती सावित्री बाई फुले यांच्या फोटो चे विधिवत पूजन केले.सावित्री बाई फुले यांचा जीवनाचा खडतर प्रवास , अनेक बिकट परिस्थितीचा सामना करत शिक्षण देण्याचे काम कसे अविरत सुरू ठेवले या विषयी विद्यार्थांना मोलाचे मार्गदर्शन केले. सावित्री बाई फुले जयंती तसेच महिला मुक्ती दिनाचे औचित्य साधत शाळेत तीन दिवसीय क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.यात दोन दिवसीय विद्यार्थ्यांची व एक दिवसीय पालकांची क्रीडा स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.विद्यार्थ्यांचा शारीरिक विकास होण्याच्या दृष्टीने नर्सरी, केजी वन , केजी टू च्या सर्वच विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला होता. पालकांनी सुद्धा यावेळी मोठ्या उत्साहात क्रीडा स्पर्धेत भाग नोंदविला. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी शाळेतील शिक्षिका सुवर्णा पिसे, करिश्मा तेलरांधे , आरती भुरे यांनी परिश्रम घेतले.





