Home घडामोडी सुकळी स्टेशन जवळ खड्डा वाचवत घडला दूचाकी वाहनाचा अपघात: दोन जख्मी

सुकळी स्टेशन जवळ खड्डा वाचवत घडला दूचाकी वाहनाचा अपघात: दोन जख्मी

141

सेलु :–

हिंगणघाट कडून सुकळी स्टेशन मार्गे सेलु कडे येणाऱ्या MH32-AY 1282 वाहन क्रमांकाच्या दूचाकी वाहन चालकाचे सुकळी येथील रेल्वे गेट जवळील खड्ड्यात गाडी उसळल्याने नियंत्रण सुटल्याने झालेल्या अपघातात दोन व्यक्ती गंभीर जखमी झाले.

सदर घटना ही रविवारचे सकाळी साडे अकरा बाराच्या सुमारास घडली.

हिंगणघाट वरुन भरधाव वेगाने येणाऱ्या दुचाकी वाहनाचे सुकळी स्टेशनच्या रेल्वे गेटजवळ असलेल्या खड्ड्याला वाचवत असताना नियंत्रण सुटले दोघेही खाली पडले.

यात प्रवास करत असलेले राम झाडे ( 38 ) यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे. तर निलेश गिरी ( 27 ) यांच्या पायाला जबर दुखापत झाली. हे दोघे ही हिंगणघाट चे रहिवासी आहेत.

जखमींना तातडीने उपचारासाठी ग्रामीण रुग्णालय, सेलू येथे हलविण्यात आले होते. परंतु राम झाडे यांच्या डोक्याला गंभीर दुखापत असल्यामुळे व निलेश गिरी यांना देखील पायाला जबर दुखापत असल्याचे प्राथमिक उपचार करुन पुढील उपचारार्थ सेवाग्राम येथे दाखल करण्याचे सांगितले. प्रज्वल लटारे या रुग्णमित्राने वेळ न गमावता आपल्या रुग्णवाहिकेने तातडीने या दोघांना सेवाग्राम रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले.

स्थानिक पोलिसांनी घटनेची नोंद घेतली असून, अपघाताच्या बाबतीत अधिक तपास सुरु आहे.