Home Breaking News घोराडमध्ये बालकांसाठी सुसंस्कारांचा अनोखा उपक्रम

घोराडमध्ये बालकांसाठी सुसंस्कारांचा अनोखा उपक्रम

77

सेलू :– पंकज तडस 

तालुक्यातील घोराड येथील विठ्ठल-रुख्माई देवस्थानात ४ मे ते १५ मे दरम्यान विनामूल्य बाल सुसंस्कार शिबिराचे आयोजन करण्यात आले असून या उपक्रमाला गावासह परिसरातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.
संत केजाजी महाराज हरिपाठ मंडळ आणि केजाजी महाराज चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या शिबिरात बालकांच्या सर्वांगीण विकासावर भर दिला जाणार आहे. ह.भ.प. नरेश महाराज पाटील व ह.भ.प. प्रमोद महाराज ठाकरे (आळंदी) यांच्या मार्गदर्शनाखाली शिबिर पार पडणार आहे.
शिबिरात लाठी-काठी प्रशिक्षणासोबत हरिपाठ, भगवद्गीता, हनुमान चालीसा, विष्णू सहस्त्रनाम, ज्ञानेश्वरी ओव्या तसेच मृदुंग यांसारख्या सांस्कृतिक व आध्यात्मिक घटकांचे शिक्षण दिले जाणार आहे. यासाठी अनुभवी प्रशिक्षक व तज्ञ मंडळी मार्गदर्शन करणार आहेत.
विशेष म्हणजे, विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी राहण्याची व भोजनाची मोफत व्यवस्था करण्यात आली असून तालुक्यातील अधिकारी देखील मार्गदर्शनासाठी उपस्थित राहणार आहेत. देवस्थानाच्या पवित्र वातावरणात होणाऱ्या या शिबिरामुळे बालकांना संस्कारांसह आध्यात्मिक अनुभवही मिळणार आहे.
इयत्ता ४ थी ते १२ वीपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी हे शिबिर खुले असून इच्छुकांनी डॉ. सुरेंद्र भुते, विजय माहुरे, पुरुषोत्तम गुजरकर, परसराम गोमासे व सौरभ पोहाणे यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.