Home स्थानिक बातम्या आंतरशालेय कराटे स्पर्धेतील पदक विजेत्यांचा गुणगौरव सोहळा उत्साहात संपन्न

आंतरशालेय कराटे स्पर्धेतील पदक विजेत्यांचा गुणगौरव सोहळा उत्साहात संपन्न

30

वर्धा : 

आजच्या स्पर्धात्मक युगात जो स्पर्धेत प्रथम येतो तोच खरा रोल मॉडेल बनतो. खेळाडूंनी परिश्रम, शिस्त आणि आत्मविश्वासाच्या जोरावर स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली पाहिजे,” असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्याचे गृह (ग्रामीण), गृहनिर्माण, शालेय शिक्षण, सहकार व खनिकर्म तथा वर्धा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी केले.

18 एप्रिल रोजी शिववैभव सभागृह येथे कराटे-डो स्पोर्ट्स असोसिएशन, वर्धा जिल्हा यांच्या वतीने आयोजित आंतरशालेय राज्य व राष्ट्रीय स्तरावरील खेळाडूंच्या सत्कार सोहळ्यात अध्यक्षस्थानावरून बोलत होते.

यावेळी मंचावर ज्येष्ठ समाजसेवक मोहनबाबू अग्रवाल, इमरान राही, सतीश इखार, मोहन मोहिते, विजय सत्याम, अभुदय मेघे, अतुल तराळे, संदीप चिचाटे, प्रदीप बजाज, पवन तिजारे, अर्चनाताई भोंमले, विद्याताई कळसाईत, गंगाधर पाटील, पृथ्वीराज शिंदे, संतोष सेलुकर, संजय जैस्वाल, अंबुज पांडे, राजू बानमारे, कृष्णा जोशी, नितीन जाधव, इंद्रजीत वाघमारे, अमित कावडकर आदी मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमादरम्यान राज्यस्तरीय स्पर्धेसाठी सब ज्युनिअर, कॅडेट व ज्युनिअर कराटे चॅम्पियनशिपसाठी वर्धा जिल्हा निवड चाचणी स्पर्धाही घेण्यात आली. स्पर्धेची तांत्रिक जबाबदारी नागपूरचे राष्ट्रीय पंच शिहान अनवर अली तसेच अमरावतीचे सेन्साई वेदांत डाहे व सेन्साई ध्रुव बांगरे यांनी पार पाडली.

कार्यक्रमाचे आयोजन संघटनेचे अध्यक्ष सेन्साई काशिनाथ रघाटाटे, सचिव शिहान मंगेश भोंगाडे व कोषाध्यक्ष सौ. मनीषा राऊत यांनी केले. प्रस्तावना सेन्साई निलेश राऊत, संचालन सेन्साई पूजा गोसटकर तर आभार सेन्साई अभिषेक सोनवणे यांनी मानले.

यावेळी राष्ट्रीय सुवर्णपदक विजेते देवांशु लाखे, नैतिक राऊत, मोहिनी चुटे, पियूष सिंग, कैवल्य सागरकर, राष्ट्रीय स्पर्धेत सहभागी गौरव असानी, तसेच वर्धा जिल्ह्यातून नॅशनलला कोच म्हणून जाणारी पहिली महिला प्रशिक्षक कु. रुचिका ढेंबरे यांचा सत्कार करण्यात आला. तसेच राज्यस्तरीय स्पर्धेत प्राविण्य मिळवणारे पियूष हावलदार, समीर देवतळे, अर्णव लोखंडे, साहिल तेलहांडे, भार्गव खेवले, मधुरा गावंडे, स्नेहा बलवीर यांचा शॉल, श्रीफळ, सन्मानचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन गौरव करण्यात आला.