सेलू :–
ब्रह्माकुमारीज् भगत ले- आउट, सेलू येथे दिनांक 21 जून 2025 रोजी आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा करण्यात आला. या वर्षीची थिम “एक पृथ्वी, एक आरोग्य” याला अनुसरून हा कार्यक्रम घेण्यात आला. प्रसंगी स्वास्थ व आरोग्य विषयी मार्गदर्शन करताना डॉक्टर खुशबू जोशी म्हणाल्या” योग ही एक प्राचीन पद्धत आहे ज्याचे उगम स्थान आपला भारत आहे . ही केवळ शारीरिक प्रक्रिया नसून आत्म्याला परमात्माशी जोडण्याची प्रक्रिया आहे आजच्या तरुण पिढी ने याचे महत्त्व जाणून घेणे अति आवश्यक आहे पाश्चात्य संस्कृतीचे अनुसरण करण्याऐवजी आपल्या संस्कृतीशी जुळणे ही काळाची गरज आहे”. याप्रसंगी शारीरिक प्राणायाम व योगाचे प्रात्यक्षिक अमित मुडे यांनी दिले. ब्रह्माकुमारीज् सेलूच्या संचालिका दर्शना दीदी यांनी राजयोगाची प्रक्रिया स्पष्ट केली व सगळ्यांना आत्म अनुभूती करविली. कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलाने झाली कार्यक्रमाला आणि रामेश्वर धर्मुळ व अमृतलाल व्यास यांची विशेष उपस्थिती होती.